भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राजकारण करू नका; लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना ठणकावले – eNavakal
देश मंत्रालय

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राजकारण करू नका; लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांना ठणकावले

नवी दिल्ली – भीमा कोरगाव घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले . सत्ताधारी भाजपा आणि  काँग्रेस खासदारांनी एकमेकांवर आरोप करत गोंधळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत राहण्याचे आवाहन करत भीमा – कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राजकारण करू नका असे ठणकावले .

भीमा – कोरेगाव घटनेचे हिंसक पडसाद महाराष्ट्रभर उमटत असताना लोकसभेत या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी भीमा – कोरेगाव येथील हिंसेमागे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला तसेच जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे दलितांवर अत्याचार होतात असा आरोप त्यांनी यावेळी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नी सभागृहाला उत्तर द्यावे असा आग्रह करत मोदी म्हणजे मौनीबाबा झाले आहेत असा टोला लगावला.

भाजपा खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काँग्रेसवर आरोप करताना तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

भाजपाने काँग्रेस समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ब्रिटिशांनंतर काँग्रेस तोडा आणि राज्य करा निती अवलंबत आहे. काँग्रेस परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. आग विझवण्याऐवजी ती भडकावण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राहुल गांधी करत आहेत असा आरोप भाजपाने केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More