भीमा-कोरेगाव हिंसाचार! गौतम नवलखा यांना तूर्त दिलासा – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

भीमा-कोरेगाव हिंसाचार! गौतम नवलखा यांना तूर्त दिलासा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याचा दावा करून माओवाद्यांची संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. नवलखा यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकेची अंतिम सुनावणी 26 एप्रिलला निश्चित केली. तोपर्यंत त्यांच्याविरोधात कारवाई न करण्याचे न्यायालयाने यापूर्वी पुणे पोलिसांना दिलेले आदेश कायम ठेवले.
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी नवलखा यांच्यावतीने अ‍ॅड. युग चौधरी यांनी बाजु मांडताना गौतम नवलखा हे एक पत्रकार आणि लेखक आहेत. देशातील संघर्षमय ठिकाणी जाऊन त्यांनी त्यावर अनेक पुस्तकं
लिहिली आहेत.
अमर्त्य सेन यांनीही त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर काही वेळा त्यांनी काही ओलीस ठेवलेल्या पोलिसांची सुटका करण्यासाठी नक्षली आणि भारत सरकार यांच्यात वाटाघाटी करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. दोन्ही बाजूला चांगले संबंध असल्यामुळेच त्यांच्यावर ही जबाबदारी विश्वासाने सोपवण्यात आली होती. त्यामुळे अशा व्यक्तीवरच शहरी नक्षलवाद पसरवल्याचा आरोप कसा होऊ शकतो? असा युक्तिवाद करून पोलिसांच्या कार्यपध्दतीवरच आक्षेप घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More