भीमा-कोरेगावप्रकरणी ’एल्गार परिषद’ दोषी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भीमा-कोरेगावप्रकरणी ’एल्गार परिषद’ दोषी

मुंबई – भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी ‘एल्गार परिषद’ सर्वस्वी दोषी असून या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजो भिडे व हिंदुत्त्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांचा थेट संबंध दिसून येत नाही, असा निष्कर्ष ‘सिटिझन फोरम फॉर जस्टिस’ या स्वयंसेवी संस्थेने काढला आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न संवेदनशीलपणे व जास्त गंभीरतेने हाताळावेत. तसेच एल्गार परिषद व याप्रकरणातील अन्य संस्थांच्या आर्थिक स्त्रोतांची सरकारने सखोल चौकशी करावी, अशा सूचनाही सिटिझन फोरम फॉर जस्टिस या संस्थेने सरकारला केल्या आहेत. भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारामागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत हे शोधण्यासाठी सीएफएफजे या बंगळुरूमधील संस्थेने सत्यशोधन अहवाल बनवला आहे. त्याची माहिती आज सीएफएफजेच्यावतीने माध्यमांना देण्यात आली.
‘एल्गार परिषद’ हा दलितांच्या सुमारे अडीचशे स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रिकरणासाठी तयार केलेला मंच आहे. या मंचातर्फे 1 जानेवारीच्या सहा ते आठ आठवडे आधीपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रेरणा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये प्रक्षोभक व भडक व्याख्याने देण्यात येत होती. दलित व अन्य समाजात संघर्ष निर्माण करण्याची ही पूर्वतयारी होती. त्यावेळी पोलिसांनीही त्यांची भूमिका तितकीशी चांगली बजावली नाही. ते या घटना, ही व्याख्याने रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही, अशी माहिती यावेळी सीएफएफजेच्या सत्यशोधन समितीचे सदस्य डॉ. कमल मेहता यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More