भिवंडी – कल्याण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य – eNavakal
News अन्य महाराष्ट्र

भिवंडी – कल्याण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

भिवंडी – शहरातील राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर पर्यंतच्या भिवंडी – कल्याण रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यांमुळे महिला, कामगार, विद्यार्थी व रुग्णांना या रोडवरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.त्यासाठी पालिका प्रशासनाने भिवंडी – कल्याण रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राम लाहारे यांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या रस्त्यावर जेएमसी या बांधकाम कंपनी मार्फत उड्डाणपूल बनविण्याचे काम सुरु असून उड्डाणपुलाच्या कामादरम्यान या 2 किमी.लांबीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदरचे खड्डे बुजविण्यासह व रस्ता सुस्थितीत ठेवण्याची सर्वस्वी जबादारी हि जेएमसी इन्फ्रा.प्रा.लि.कंपनीची आहे. एमएमआरडीएने 3 कोटी रुपयांची स्वतंत्रपणे तरतूद केलेली आहे.मात्र सदर कंपनी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

पालिका प्रशासनाचेही या रोडकडे दुर्लक्ष होत असून प्रशासन जेएमसी कंपनीला पाठीशी घालत असल्याने या कंपनीवर कोणतीही कारवाई होत नाही.
भिवंडी कल्याण मार्गावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.ज्याचा नाहक त्रास प्रवाशांना होत असून या खड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे हकनाक बळी जात असून काहींना कायमचे अपंगत्व आल्याच्या अनेक घटना घडत आहेत.तसेच रोजचे अपघात सत्र सुरूच आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या 191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More