भिवंडी एसटी स्थानक ते नागांव रस्ता दुरुस्त करण्याची मागणी  – eNavakal
महाराष्ट्र वाहतूक

भिवंडी एसटी स्थानक ते नागांव रस्ता दुरुस्त करण्याची मागणी 

भिवंडी – भिवंडी शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेला भिवंडी एसटी स्थानक ते नागांव,गायत्रीनगर रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.२ किमी.लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे मोटार सायकल ,रिक्षा अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करताना अनेकवेळा अपघात घडत आहेत.या रस्त्यावरील वाढते अपघात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने एसटी स्थानक ते नागांव ,गायत्रीनगर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी समाजसेवक अनंता पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या रस्त्यावर पालिकेने भुयारी गटाराच्या कामासाठी खोदकाम करून रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही.तसेच वर्षभरापासून रहदारीमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत.या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना रोजचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे पालिकेने तत्काळ रस्ता दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी समाजसेवक अनंता पाटील यांनी केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करण्याची मागणी

पुणे – जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने ‘मेगाभरती’ रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला...
Read More
post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More