भिवंडीत पतीच्या हत्या प्रकरणी फरार पत्नी प्रियकराला आठ दिवसांची पोलीस कोठडी – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र मुंबई

भिवंडीत पतीच्या हत्या प्रकरणी फरार पत्नी प्रियकराला आठ दिवसांची पोलीस कोठडी

भिवंडी- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने २२ वर्षीय प्रियकराच्या मदतीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळे करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागाव परिसरात उघडकीस आली होती. हत्येनंतर फरार झालेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला शांतीनगर पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातून सापळा रचून मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.पत्नी गुलशबा (२४) तिचा प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी ( २२ रा. कसाईवाडा ) अशी अटक करण्यात आलेल्या प्रेमींची नावे आहेत.

कैफ उर्फ मनोजकुमार उर्फ राहूल जगदीशप्रसाद सोनी (३०) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मृत कैफ उर्फ मनोजकुमार सोनी याचा प्रेमविवाह गुलशबा हिच्याशी ७ वर्षापूर्वी झाला होता. त्याने प्रेमिका गुलशबा हिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतरही केले होते.मृत मनोजकुमार आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करीत असल्याने दीड ते २ महिन्यांनी घरी येत असे.३ जानेवारी रोजी तो घरी आला असता त्याने पत्नीला रिजवानसोबत अश्लील चाळे करताना पाहिले त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.आपल्या अनैतिक संबंधात आता पती अडथळा ठरणार असे वाटू लागल्याने पत्नी गुलशबा व प्रियकर रिजवान या दोघांनी संगनमत करून मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून प्रेयसीसोबत फरार झाली. मात्र घटनेच्या चार दिवसानंतर रिजवानने नातेवाईक शाबादला संपर्क केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शाबादने तात्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. आरोपी पत्नी तिन्ही मुलांना आजीकडे सोडून प्रियकरासोबत उत्तरप्रदेशात पळून गेल्याची माहिती तपास अधिकारी मनजितसिंग बग्गा यांना मिळाली असता त्यांनी पोलीस पथकासह उत्तरप्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील गावात पाठवले असता मोठ्या शिताफीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. दोघांनाही गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More