भिवंडीत खंडणीसाठी के.एन.पार्क हॉटेलच्या महिला व्यवस्थापिकेवर गोळीबार – eNavakal
गुन्हे मुंबई

भिवंडीत खंडणीसाठी के.एन.पार्क हॉटेलच्या महिला व्यवस्थापिकेवर गोळीबार

भिवंडी- भिवंडी – कल्याण मार्गावरील रांजणोली बायपास नाका येथील के.एन.पार्क हॉटेलमध्ये शिरून खंडणीखोर लुटारूंनी महिला व्यस्थापिकेवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी दुपारी 2. 15 वाजताच्या सुमारास घडली आहे.हॉटेलमधील स्वागत कक्षात बसलेल्या व्यवस्थापिकेवर गोळीबार करून खंडणीखोर फरार झाले आहेत.स्वरा सिरसाठ (25) असे जखमी हॉटेल व्यवस्थापिकेचे नाव असून तिच्यावर कोनगावच्या वेद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारी टोळीतील दोन शार्प शूटरने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळावरून हॉटेल मालकाला गॅगस्टर सुरेश पुजारीने धमकी दिल्याची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.हॉटेल मालकाला खंडणीसाठी यापूर्वीही धमकी देण्यात आली होती.मात्र हॉटेल काउंटरवर बसलेली महिला हि मालक असल्याचे समजून या तरुणीवर गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोळीबाराच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी घटनास्थळी दाखल होवून तपासाचे निर्देश दिले आहेत.गोळीबारात जखमी झालेली मुलगी शहापूर येथील राहणारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.घटनास्थळाचा कोनगांव पोलीसांनी पंचनामा करून जखमी तरुणीच्या जबाबानुसार दोन अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर तोंडाला काळा कपडा बांधून आला होता तर दुसरा दुचाकीवर मंकीटोपी घालून बाहेर उभा होता.एका हल्लेखोराची प्रतिमा हॉटेलमध्ये लावलेल्या सिसिटीव्हीत कैद झाली असून कोनगाव पोलिस ठाण्याचे पोनि. चंद्रकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More