भावा जिंकलस! पायातून रक्त, तरीही वॉटसनची तडाखेबंद फलंदाजी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

भावा जिंकलस! पायातून रक्त, तरीही वॉटसनची तडाखेबंद फलंदाजी

मुंबई – कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखील मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या विजेतेपदाला चौथ्यांदा गवसणी घातली. मात्र सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरु आहे ती शेन वॉटसनच्या जिगरबाज खेळीची. सोशल मीडियावर आपल्या संघासाठी जीव ओतून खेळणं म्हणजे काय असते हे कुणी शेन वॉटसनला विचारावे, असेच म्हटले जात आहे. त्याच झालं असं की, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या अंतिम सामन्यात वॉसनच्या पायाला दुखापत होऊनही तो खेळत राहिला. सामन्यानंतर त्याच्या पायाला सहा टाके पडले.

मुंबईच्या संघाने 149 धावा केल्यानंतर विजयासाठी 150 धावांचा पाठलाग करताना चेन्नई संघ 148 धावा करू शकला. अवघ्या एका धावेने ते पराभूत झाले. पायातून रक्ताची धार लागली असताना देखील वॉटसनची 80 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याची विजार रक्ताने माखली होती, मात्र तो काही मैदानातून हलला नाही. सामना संपल्यानंतर त्याला 6 टाके पडले. हरभजन सिंग याने ही गोष्ट सर्वांना सांगितली. मैदानावर डाइव्ह मारताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण कोणालाही काहीही न सांगता वॉटसन एकटा खेळत राहिला, असे हरभजनने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून संघाच्या विजयासाठी लढलेल्या वॉटसनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नवी मुंबईत मुसळधार! सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी

नवी मुंबई – कालपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगर आणि परिसरात दाणादाण उडवली आहे. नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका सिडकोने खारघरमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका, मुख्यमंत्र्यांचे हॉटेल चालकांना आवाहन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिर्डीचे साईमंदिर खुले करण्याची तयारी पूर्ण! मात्र शासनाचा आदेश येणे बाकी

शिर्डी – शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने तयारी पूर्ण केली असून शासनाचा आदेश येणे बाकी आहे. तो आदेश येताच सुरक्षेचे नियम पाळून...
Read More
post-image
देश राजकीय

निर्मला सीतारमण या काळी नागीण! तृणमूलच्या नेत्यांची जीभ घसरली

कोलकाता – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३० जणांना लागण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे यासाठी रस्त्यावर उतरलेले राज्यातील पोलीसच आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत....
Read More