भालचंद्र माळी यांना संबोधीचा कँप्टन पुरस्कार प्रदान – eNavakal
अन्य महाराष्ट्र

भालचंद्र माळी यांना संबोधीचा कँप्टन पुरस्कार प्रदान

सातारा – संबोधी प्रतिष्ठानचे वतीने संस्थापक सदस्य दिवंगत कँप्टन साहेबराव बनसोडे यांच्या नावाचा यावर्षाचा ११ वा पुरस्कार फुले-आंबेडकर चळवळीत २० वर्षे योगदान देणारे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे जिल्हाध्यक्ष व राज्याचे मार्गदर्शक भालचंद्र माळी यांना प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  प्रा. गौतमीपुत्र म्हणाले, भारत देशाची मूळ समस्या येथील जातीव्यवस्था ही आहे. धर्माचे अधिष्ठानामुळे तिला पावित्र्य प्राप्त झाले असल्याने ती उध्वस्त करणे महाकठीण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणारा धर्म नाकारला व बौद्धधम्माचा स्वीकार करून सर्व धर्माच्या तुरुंगातून मुक्ती साधली आहे. धम्म स्वीकारणारे त्यांचे अनुयायांनी आपण मानवमुक्तीचे सैनिक आहोत हे लक्षात ठेवून वागावे. बाबासाहेबांच्या ‘मुक्ती कोण पथे ?’ या भाषणाचे प्रबोधन झाले पाहिजे.

सत्काराला उत्तर देताना भालचंद्र माळी म्हणाले, उपरे काकांच्या पार्थिवास साक्ष ठेवून मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मिळायचा असेल तर बुद्ध धम्मात जाण्याशिवाय पर्याय नाही. या प्रसंगी माळी यांचा ओबीसी संघटनेच्या जिल्हा व तालुका शाखांच्या वतीने जिल्हाध्यक्ष भरत लोकरे,रामचंद्र बनवडे, हणमंत सुतार, संजय गायकवाड, प्रमोद क्षीरसागर, पांबरे, आगवणे, जाधव, सुर्यवंशी यांनी सत्कार केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More