भारत पेट्रोलियम खासगीकरणाला मान्यता! उद्योग चालवणे सरकारचे काम नाही – eNavakal
News देश

भारत पेट्रोलियम खासगीकरणाला मान्यता! उद्योग चालवणे सरकारचे काम नाही

मुंबई – सरकारी मालकीची असलेली तेल कंपनी बीपीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खासगीकरणावर अखेर केंद्र सरकारने शिक्‍कामोर्तब केल्याचे संकेत दिले आहेत. कारण उद्योगधंदे चालवणे हे सरकारचे काम नाही, असे प्रतिपादन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे
दूरसंचार आणि नागरी विमानोड्डाण क्षेत्र खासगी विभागासाठी खुले झाल्याने वाढत्या स्पर्धेसह भाडे दर व शुल्कवाढ कपातीचा ग्राहकांना फायदाच झाला आहे, असेही पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.
बीपीसीएलच्या खासगीकरणाच्या प्रस्तावात केंद्रीय मंत्रिमंडळाकडून येत्या आठवड्यात विचारात घेतले जाण्याबाबत चर्चा आहे. अर्थसंकल्पातून चालू वर्षासाठी सरकारी मालकीच्या कंपन्यांतील निर्गुंतवणुकीतून 1.05 लाख कोटी रुपये उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करावयाचे झाल्यास बीपीसीएलमधील हिस्सा विक्री खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या वर्षी सरकारने, एचपीसीएल या तेल कंपनीचा संपूर्ण हिस्सा ‘ओएनजीसी’ या खासगी कंपनीला विकून टाकला. मात्र पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी बीपीसीएलच्या खासगीकरणाबाबत अधिक मत व्यक्‍त केलेले नाही.
वास्तविक बीपीसीएलच्या खासगीकरणातून केंद्र सरकारला 60 हजार कोटी रुपये मिळवता येऊ शकतात. या कंपनीत सरकारचे 53.29 टक्के इतके भागभांडवल आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

Live राजकीय घडामोडी

१५.३० – राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव १५.०० – राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस १४.४९ – राष्ट्रवादीकडे बहुमत नाही; काँग्रेससह शिवसेना सोबत आल्यानंतरच सरकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More