भारतीय संघात कोणताच बदल नको-गांगुली – eNavakal
News क्रीडा विदेश

भारतीय संघात कोणताच बदल नको-गांगुली

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाला असला तरीही अंतिम अकरा खेळाडूंत बदल न करण्याचा सल्ला माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिला आहे. उलट, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी, असे मत त्याने व्यक्त केले.

गांगुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक धाव बनवावी लागेल. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. आणि मला वाटते की भारतीय संघात पुनरागमन करण्याची क्षमता आहे. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांना अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण या दोघांनी अशा परिस्थितीत धावा केल्या आहेत. गांगुली म्हणाला, मी पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार धरणार नाही. जर तुम्ही कर्णधार असाल तर तुमच्यावर टीका ही होणारच. जिंकल्यानंतर शुभेच्छाही मिळतात. कोहलीवर टीका यासाठी सुद्धा होत आहे, कारण त्याने आपल्या फलंदाजांना बाहेर खेळण्यापूर्वी काही संधी द्यायला हव्यात. इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंगपुढे अपयशी ठरणे हे बहाणे चालणार नाहीत. कारण प्रत्येकालाच इंग्लंडमधील स्थिती माहीत आहे. हे सुद्धा खरे आहे की, नेहमी अंतिम अकरामध्ये बदल केल्यामुळे खेळाडूंच्या मनात भीती असते की एवढ्या वर्षांनंतरही व्यवस्थापनाचा विश्वास जिंकण्यात आपण अपयशी ठरत आहोत. अंतिम अकरात बदल नको, असा सल्लाही त्याने या वेळी दिला.
सचिनला पाहून दादा चक्क घाबरला होता. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर लहानपणापासून चांगले मित्र आहेत. तसेच त्यांना भारताचे सर्वात स्फोटक सलामीवीर म्हणूनही ओळखले जाते. पण सचिनला पाहून दादा चक्क घाबरला होता. सौरव गांगुलीनी याचा खुलासा केला आहे. सौरव गांगुलीने एका मुलाखतीदरम्यान अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झोपेत चालायची सवय असल्याचा मोठा खुलासा यावेळी दादाने केला आहे. या मुलाखतीमध्ये दादाने भारतीय संघाबद्दलचे आणि ड्रेसिंग रूममधील अनेक मजेदार
किस्से सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More