भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कुशीनगरला कोसळले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कुशीनगरला कोसळले

लखनऊ – भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान आज उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे कोसळले. या घटनेमध्ये वैमानिकाचा जीव वाचला तर विमान पूर्णपणे जळून खाक झाले.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील हे विमान प्रमुख लढाऊ विमानांपैकी एक आहे. सुपरसॉनिक जॅग्वार विमानाने गोरखपूर येथील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण घेतले होते. त्यानंतर 10 मिनिटांनंतर पायलटचा संपर्क तुटला. कुशीनगरमधील हेतिमपूर गावातील शेतात हे विमान कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्याने सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केल होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विमान कोसळण्यामागची कारणे तपासण्याचे निर्देश उच्च अधिकार्‍यांनी दिले आहेत. हवाई दलाने देखील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More