भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरण करणार – रेल्वेमंत्री – eNavakal
देश

भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरण करणार – रेल्वेमंत्री

मुंबई – मुंबई रेल्वे मंडळ हे 100 टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ असून भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. त्यावेळी गोयल बोलत होेते.

मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहायाने करण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासन म्हणजे डबल इंजिन आहे. त्यामुळे विकासात्मक कामे जलद गतीने होत आहेत, असे यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अवघ्या 19 तास 30 मिनीटांत पोहोचविणार्‍या पहिल्या राजधानी रेल्वेचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला. रोहा येथून केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी एकाचवेळी दिवा -पनवेल-रोहा या ट्रेनचा शुभारंभ केला. याचबरोबर पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर विस्तारीत सेवा ट्रेनचाही डिजीटल पद्धतीने मंत्री गोयल यांनी तर पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More