भारतीय महिलेची हीच खरी समानता – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

भारतीय महिलेची हीच खरी समानता

भारतामध्ये स्रीच्या समानतेविषयी वारंवार चर्चा होत असते. आतादेखील शबरीमाला देवस्थानमधल्या महिलांच्या प्रवेशावरून वाद सुरू आहेत. एवढेच नव्हे तर विवाहबाह्य संबंधांविषयी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन स्री कशी स्वतंत्र राहू शकते. हे सांगण्याचा फार मोठा आटापीटा केला. म्हणजे शबरीमाई देवस्थानाचा प्रवेश विवाहबाह्य संबंध अशा फुटपट्टया लावून स्रीची समानता किंवा तिच्या स्वातंत्र्याचे मोजमाप केले जात असेल तर अजूनही आपण खर्‍या अर्थाने स्रीच्याच व्यक्तिमत्वाचा अर्थ समजून घेतलेला नाही, असे म्हणावे लागेल. एकीकडे अशा या अतिशय तात्कालिक आणि बर्‍याचशा अर्थहीन गोष्टींवर रणधुमाळी सुरू असतानाच आपल्याच देशातील अवघ्या 46 वर्षांची एक महिला विश्व स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वोच्च अर्थसंस्थेच्या मुख्य अर्थशास्रज्ञ म्हणून नियुक्त केली गेली आहे. गीता गोपिनाथ असे या तरुणीचे नाव असून प्रतिष्ठित अशा संस्थेमध्ये सर्वोच्च पदी मिळवलेला प्रवेश हा अधिक भूषणावह ठरतो. दिल्लीच्या श्रीराम कॉलेजच्या कलाशाखेत अर्थशास्र हा मुख्य विषय घेऊन उच्चशिक्षणासाठी परदेशी गेलेल्या गीता गोपिनाथ यांनी महिलेच्या गुणवत्तेचा आणि स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा गौरव घडवून आणला आहे. असे म्हणावे लागेल. आणखी आठ दिवसांनी भारतात नवरात्रीच्या उत्सवाला उधाण येईल. मग गरबा नृत्यातील महिलांच्या सहभागापासून ते नऊ दिवस त्यांनी कोणकोणत्या साड्या नेसायच्या अशा विषयांवरही चर्चा होत राहील. परंतु यापेक्षा अशा काही भारतीय महिला आहेत की त्या आपल्या गुणवत्तेचे रंग उधळून भारताचा सन्मान करताना दिसून येतात. जगाचे अर्थकारण पाहाणारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था त्यानिमित्ताने जगातल्या अर्थकारणांचा घेतला जाणारा वेध, सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती, भारताचा आर्थिक महासत्ता होण्याकडे सुरू असलेला प्रवास, या सर्व पार्श्वभूमीवर गीता गोपिनाथ यांची झालेली नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानावी लागते. आतापर्यंत भारताच्या दोघांनाच हे प्रमुख पद भूषवण्याची संधी मिळाली होती. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे पद भूषवले होते. तर कौशिक बासू यांनी जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्रज्ञ म्हणून पद भूषवले होते आणि आता तशाच स्वरूपाचा मान गीता गोपिनाथ यांना मिळाला आहे.

भारतीय बुध्दीमत्तेचा गौरव

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या अशा संस्थांवर जेव्हा अशा नियुक्त्या होतात आणि त्यात भारतीयांचा होणारा समावेश गुणवत्तेबरोबरच अशा संस्थांचे तितक्याच सक्षमपणे नेतृत्व भारत करू शकतो. हेदेखील यानिमित्ताने अधोरेखित होत असते. त्यातही जगाचे अनेक व्यवहार ज्या अर्थकारणाशी निगडित असतात. त्या क्षेत्रात भारतीय बुध्दीमत्तेला जेव्हा असे सन्मानित केले जाते तेव्हा त्याचे महत्त्व आणखीनच वाढलेले असते. आतापर्यंत जगातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रमुख पदी महिलांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. अगदी अंतराळ क्षेत्रातही भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्सने आपला ठसा उमटवला आहे. कल्पना चावलाचे नावही यासंदर्भात महत्त्वाचे ठरते. यावरून गुणवत्ता किंवा बुध्दीमत्तेत पुरुषांच्या इतक्याच आघाडीवर असलेल्या भारतीय महिलांच्या समानतेचा किंवा स्वातंत्र्याविषयी भारतात होत असलेला गदारोळ हा वस्तुस्थितीपेक्षा केवळ भावनिक आधारावर जास्त होतो, असे म्हणावे लागते. भारतीय महिलेने खरे तर प्राचीन काळापासूनच आपल्या गुणवत्तेचे दर्शन घडवलेले आहे. गार्गी, मैत्रेयीसारख्या ऋषीकन्यांनी आपल्या बुध्दिमत्तेतून हे सिध्दही केले होते. हीच परंपरा आजही चालू आहे. गीता गोपिनाथ हे या बदलत्या काळातील आधुनिक स्रीचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येऊ शकते. इतक्या लहान वयामध्ये ही संधी मिळाल्यामुळे भविष्यकाळात आणखी मोठी पदे भूषवू शकेल. कदाचित रघुराम राजन यांच्याप्रमाणे ही देखील भारताच्या रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर म्हणून नियुक्त होऊ शकेल. जिथे जिथे गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली तिथे तिथे भारतीय महिलांनी त्या संधीचे सोने केल्याचे आपल्याला दिसून येते. तिच्या या नियुक्तीचे खरे तर सर्वदूर स्वागत व्हायला हवे होते. परंतु शबरीमलाई किंवा तिहेरी तलाकपर्यंतच्या विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्याच्या बरोबरीने याही गोष्टीची सौम्यपणे का होईना परंतु दखल घेतली गेली असती तर ते जास्त योग्य ठरले असते.

आंतरराष्ट्रीय नेतृत्व

साधारणतः गेल्या दहा वर्षांपासून भारतीय महिलांच्या कर्तृत्वाचा चढता आलेख पाहायला मिळतो. मग विविध पदांवरच्या नियुक्तया असोत किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये भरपूर सुवर्णपदके पटकावून सुवर्णकन्यांनी केलेले कर्तृत्व असेल या सर्व ठिकाणी आपला स्वतंत्र ठसा निर्माण होताना दिसून येतो. भारत हा जगातील सर्वात मोठा युवकांची संख्या असलेला देश आहे. त्या युवकांकडून जगाची देखील अशाच स्वरूपाची अपेक्षा असू शकते. कारण काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगातील बुध्दीमान अशा पंचेचाळीस अर्थशास्रज्ञांची यादी केली होती त्यात गीता गोपिनाथ या एकमेव भारतीय तरुणीचा समावेश होता. आता तर तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताने आपले स्थान निर्माण केलेले आहे. भविष्यकाळामध्ये भारतातर्फे पाठवल्या जाणार्‍या चांद्रयानामध्येसुध्दा महिलांचा समावेश होऊ शकतो. आज कोणतेही असे क्षेत्र शिल्लक राहिलेले नाही ज्यामध्ये भारतीय बुध्दीमत्तेने आपली चमक दाखवलेली नाही. करियर, स्पर्धा, नैपुण्य किंवा बुध्दीमत्ता या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करीत असताना आपण स्वीकारलेल्या क्षेत्रात शक्यतो तितकेच मोठे स्थान निर्माण करण्याची भारतीय मानसिकता निश्चितच जगालासुध्दा आकर्षित करणारी ठरते. अनेक वेळेला आपण पाश्चिमात्य लोकांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण करतो. किंबहुना नको त्या गोष्टींचेदेखील अनुकरण करण्याची चढाओढ दिसून येते. त्याऐवजी अनेक अडीअडचणींवर मात करीत किंवा अशी शिखरे पार केली जातात त्यावेळेला त्याचा एक विशेष आनंद किंवा समाधान प्राप्त होत असते. जगात सर्व दृष्टींनी महत्त्वाचे असलेले अर्थक्षेत्र जेव्हा एखादी महिला काबीज करते त्यावेळेला ही आर्थिक समानताच अधिक संयुक्तिक ठरत

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

सायना नेहवालची अंतिम फेरीत धडक

ओडेन्से, डेन्मार्क – भारताच्या सायना नेहवालने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेड-दिल्ली विमानसेवेला हिरवा कंदील

नांदेड – केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरू करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अयोध्या यात्रेच्या तयारीची सुरुवात नाशिकमधुन – संजय राऊत

नाशिक – राम मंदिर हा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही या विषयात कोर्ट मानत नाही. कोणतच कोर्ट या विषयाचा निवाडा करू शकत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More