भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल – eNavakal
क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल

डोंगाएसिटी (द. कोरिया) – भारतीय महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या आशियाई चषक चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आपल्या साखळी स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारताने मलेशियाचा 3-2 गोलांनी पराभव करून सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. भारतातर्फे गुरजीत कौर, वंदना कटारिया, लारेमिसामीने प्रत्येकी 1 गोल केला. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून मलेशियाला विजयाची संधी दिली नाही. या अगोदर भारताने जपानचा 4-1 आणि चीनचा 3-1 गोलांनी पराभव केला होता. अंतिम फेरीत भारताचा मुकाबला बलाढ्य दक्षिण कोरियाशी होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More