#HockeyWorldCup2018 भारतीय महिला हॉकी संघाची कसोटी – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#HockeyWorldCup2018 भारतीय महिला हॉकी संघाची कसोटी

लंडन – आजपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत तब्बल 5 वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या राणी रामपालच्या भारतीय महिला हॉकी संघाची खरी कसोटी लागणार आहे. 2010 साली झालेल्या स्पर्धेत शेवटी खेळला होता. त्या संघातील राणी रामपाल आणि सविता या दोघींचा अपवाद वगळता. यंदाच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील इतर सर्वच खेळाडूंची ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जरी पोहचला तरी ती भारतासाठी मोठी कामगिरी ठरू शकते. भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी 1974 च्या स्पर्धेत झाली होती. त्यावेळी भारताने चौथा क्रमांक मिळवला होता. पण त्यानंतर मात्र आतापर्यंत भारताची मजल त्याच्या पुढे कधीच गेली नाही. 2010 च्या शेवटच्या स्पर्धेत भारतीय संघ 9 व्या क्रमांकावर होता. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने चौथा क्रमांक मिळवला होता. त्यांनी सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चांगली झुंज दिली होती. बलाढ्य इंग्लंड संघाला गटातील लढतीत भारताने नमवले होते. पण कास्यपदकाच्या लढतीत मात्र इंग्लंडकडून भारतीय संघ पराभूत झाला होता.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ती स्पर्धा फायदेशीर ठरेल. भारतीय संघातील बरेच खेळाडू अनुभवी असून, अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडू 50 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळले आहेत. कर्णधार राणी पाल आणि सुनिता लाकडा या दोघींवर आघाडी फळी भारताची मोठी मदार असेल, उपकर्णधार कवितावर बचावफळीची मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाचा ‘ब’ गटात समावेश केला असून, भारताला इंग्लंड, आयर्लंड आणि अमेरिका यांच्याशी पहिल्या टप्प्यात खेळायचे आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने चांगली तयारी केली असून, स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू असे कर्णधार राणी रामपालने सांगितले. या स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया जर्मनी आणि हाँलंड या 3 संघाचे वर्चस्व राहिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More