भारतीय मल्लांसमोर तुर्कस्थानचे खेळाडू चीतपट – पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा – eNavakal
क्रीडा महाराष्ट्र

भारतीय मल्लांसमोर तुर्कस्थानचे खेळाडू चीतपट – पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

पुणे – विजय चौधरी, किरण भगत, माऊली जमदाडे व मुन्ना झुंझुरके या भारताच्या मराठमोळ्या मल्लांनी तुर्कस्थानच्या प्रतिस्पर्ध्यांना लोळवून पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील मातीचा आखाडा गाजविला. मात्र, हिंदकेसरी साबा कोहलीला तुर्कस्थानच्या इस्माईल इरकलकडून पराभवाचा धक्का बसला.

कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. भारत विरुद्ध तुर्कस्थान यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या लढतीत मुन्ना झुंझुरकेने ईयुप ओरमानला पराभूत केले. लढतीतील केवळ तिसर्‍याच मिनिटाला मुन्नाने ‘लाटणे’ डाव टाकताना ओरमानवर चीतपट करताना विजय साकारला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत माऊली जमदाडेने गुर्‍हकन बल्कीला पराभूत केले. माऊली आक्रमक चढायाने बल्की याने मैदानाबाहेर झेप घेतली. त्यानंतर काही क्षणातच माऊलीने ‘घिसा’ डावावर बल्कीला चीतपट करत विजय पटकावला.

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व मेटीन टेमिझी यांच्या लढतीत किरण भगतने ‘एकचाक’ डावात मुसंडी मारत मेटीन तेझमीला आसमान दाखवले. हिंदकेसरी साबा कोहलीला इस्माईल इरकल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. निर्धारित वेळेत दोन्ही खेळाडूंना गुण मिळविण्यात अपयश आले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रथम गुण मिळविणार्‍या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. तुर्कस्थानच्या इस्माईल इरकलने गुण मिळवत ही लढत जिंकली. चुरशीच्या झालेल्या लढतीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने अहमत सिलबिस्टला पराभूत केले. सहाव्या मिनिटाला विजय चौधरीने ‘घुटना’ डाव टाकत अहमत सिलबिस्टला चीतपट करताना लढत जिंकली.

स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री गिरीष बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर मुक्ता टिळक, आयोजक व माजी स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पुणे मनापा आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, मनपाचे क्रीडा उपायुक्त तुषार दौंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More