भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला नवा इतिहास – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा

भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला नवा इतिहास

जकार्ता – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने आज हॉकाँगचा 26-0 गोलांनी दणदणीत पराभव करून आशियाई स्पर्धेतील आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद करताना नवा इतिहास रचला. महाराष्ट्राची नामवंत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतने सुवर्णाचा अचूक वेध घेऊन या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. टेनिसमध्ये अंकिता रैनाने महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठून भारताचे पदक निश्चित केले. नामंवत महिला जिमनास्ट दीपा कर्माकरने दुखापतीमुळे आर्टिस्टीक जिमनास्टीक स्पर्धेतून माघार घेतली. पुरुषांच्या जलतरण स्पर्धेत रिले शर्यतीत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारतीय पुरुष हॉकी संघाने आपला दुसरा विजय मिळवताना. दुबळ्या हॉकाँगला सहज नमवले. ‘अ’ गटातील या एकतर्फी सामन्यात भारतातर्फे दिलप्रीत सिंह, सिमरजीत सिंह आणि मंदीप सिंह यांनी शानदार हॅटर्ट्रिक नोंदवली. भारताने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमक खेळ करून हॉकाँगला विजयाची संधी दिली नाही. भारताच्या तुफानी आक्रमणासमोर हॉकाँगचे खेळाडू काहिच करू शकले नाहीत. या अगोदर सलामीच्या लढतीत भारताने इंडोनेशियाचा 17-0 गोलांनी आरामात पराभव केला होता. आशियाई स्पर्धेत या अगोदर भारत आणि पाकिस्तानने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली होती. आता भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. 2014 च्या या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. यंदा त्याची पुनरावृत्ती केल्यास 2 सुवर्णपदक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरणार आहे. भारतीय हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात आजवरची आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. या अगोदर 1932 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने अमेरिकेचा 24-1 गोलांनी पराभव केला होता. तो विक्रम देखील आज भारताने मागे टाकला होता.
.
अंकिता उपांत्य फेरीत – 
महिला टेनिसमध्ये  एकेरीत भारताच्या अंकिता रैनाने उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात हॉकाँगच्या वॉग चॉगचा सरळ 2 सेटमध्ये 6-4, 6-1 असा आरामात पराभव केला. अंकिताने दोन्ही सेटमध्ये आक्रमक  खेळ करून  वॉगला विजयाची संधी दिली नाही. तिने फोर हॅण्ड, बॅक हॅण्ड फटाक्यांचा  छान प्रयत्न केला.
हरप्रीत सिंग उपांत्य फेरीत
कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन विभागात भारताच्या हरप्रीत सिंगने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या होतवाचा 8-0 गुणांनी आरामात पराभव केला. 87 किलो वजनी गटातील या सामन्यात हरप्रीतने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून जपानच्या खेळाडूला विजयाची संधी दिली नाही. आता उपांत्य फेरीत त्याने विजय मिळवल्यास त्याचे 1 पदक नक्की होईल, त्याचा सहकारी गुरप्रीत सिंग मात्र 77 किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीत पराभूत झाला त्याला इराणच्या मोहम्मदने नमवले. तर 130 किलो वजनी गटात चीनच्या पेगने भारताच्या नवीनला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.
भोकनाळ अंतिम फेरीत
भारतीय नोकायनपटू महाराष्ट्राच्या दत्तू भोगनाळने नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरीत स्कल्समध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचसोबत पुरुष लाईटवेट फोर संघाने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. भोकनाळने रेपेचेज फेरीत 7 मिनिटे 45.71 सेकंदाची वेळ देऊन अव्वल क्रमांक मिळवला.
दीपिका कुमारी पराभूत
भारताची नामंवत आंतरराष्ट्रीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात पराभूत झाली. ती 17 व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचे तिचे स्वप्न भंग पावले. सुरुवातीला चांगली कामगिरी करणार्‍या दीपिकाने मात्र सुमार कामगिरी केल्यामुळे तिला पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाने देखील निराशा केली. पात्रता फेरीत त्याचा सातवा क्रमांक लागला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नाशिकमध्ये एकाच दिवशी ३ लाख गरजुंना धान्य वाटप

नाशिक – सोमवारी नाशिक जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार २१४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ७९ हजार मेट्रिक क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.  नाशिकचे जिल्हा पुरवठा...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील १५० तबलिगींवर पोलिसांत गुन्हे दाखल

मुंबई – नवी दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या तब्लिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुंबईतील १५० जणांवर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आधी परदेश दौरे आणि जाहिराती बंद करा! सोनियांची मोदींना खरमरीत सूचना

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामहारीशी लढण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व खासदार आणि सर्व राज्यपालांच्या मानधनात तीस टक्के...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘मैत्री सुड उगवण्यासाठी नसते’; राहुल गांधींची ट्वीटवरून प्रतिक्रिया

नवी मुंबई – भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधे अमेरिकेला द्यावीत, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी धमकी अमेरिकेने दिली होती. या प्रकारानंतर आज काँग्रेस नेते राहुल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तराखंडमध्ये क्वारंटाईन असलेल्या वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

नैनिताल – उत्तराखंडातील रुद्रपुर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेल्या एका वृद्धाने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा वृद्ध उत्तर प्रदेशातील पीलिभीत जिल्ह्यातील राहणारा आहे. या...
Read More