‘भारतीय न्यायव्यवस्था’ जगात सर्वात विश्वासू – दीपक मिश्रा – eNavakal
देश न्यायालय

‘भारतीय न्यायव्यवस्था’ जगात सर्वात विश्वासू – दीपक मिश्रा

नवी दिल्ली – सर्वोच्च नायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा उद्या निवृत्त होणार आहेत. यानिमित्त त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोपसमारंभात त्यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविषयी गौरवोद्गार काढले. भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात बळकट आणि विश्वासू न्यायव्यवस्था आहे असे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

निरोपसमारंभात दीपक मिश्रा यांनी न्यायाधीश आणि वकिलांशी संवाद साधला. तरुण वकिलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांना सल्ला दिला. तरुण वकिलांमध्ये फार क्षमता आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. तर आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या आत्तापर्यंतच्या कामाबद्दल अतिशय संतुष्ट आहे. एकूणच काम करताना मी लोकांचा भूतकाळ पाहून निर्णय देत नाही तर त्यांची सध्याची कृती आणि दृष्टीकोन पाहून त्यांची पारख करतो. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या निवृत्तीनंतर रंजन गोगोई हे त्यांचा पदभार सांभाळणार आहेत. यावेळी गोगोई यांनी मिश्रांच्या कामाचे कौतुक केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना योग्य तो न्याय देण्यात दीपक मिश्रा यांनी मोलाची भूमिका निभावली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

करणी सेनेच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी

राजकोट – दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला कडाडून विरोध करणार्‍या राजपुतांची संघटना असलेल्या करणी सेनेने भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)तेलात हात घालून मासा तळताना पाहिलंय का?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०१-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : हलगर्जी प्रशासनाचे बळी

भारतामध्ये धार्मिक उत्सवांमधील अपघातांमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होऊ लागल्याचे दिसून येते. पंजाबमध्ये अमृतसरला रावण दहनाचा कार्यक्रम सुरु असताना रेल्वे ट्रॅकवर उभ्या...
Read More
post-image
देश

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत उंच रेल्वे तयार होणार

देहरादून –  भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशला एक सुंदर अशी भेट दिली आहे. हिमाचल प्रदेशचे सृष्टी सौंदर्य आणि पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन भारतीय रेल्वेने एक...
Read More
post-image
महाराष्ट्र

चाकण प्लॅस्टिक कंपनीमध्ये रामदास कदम यांची धाड

पुणे – पुण्यातील चाकण येथील प्लॅस्टिक कंपनीवर धाड पडली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चाकणच्या प्लॅस्टिक कंपनीवर धाड टाकली. प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कदम यांनी प्लॅस्टिक...
Read More