भारतीय कुस्तीपटूंकडून पदकांची मोठी अपेक्षा – eNavakal
क्रीडा

भारतीय कुस्तीपटूंकडून पदकांची मोठी अपेक्षा

नवी दिल्ली – पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीपटूंकडून मोठ्या पदकांची मोठी अपेक्षा आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या कुस्तीपटूंनी नुकत्याच राष्ट्रकुल स्पर्धेत पदके पटकावली होती. त्यामुळे त्याच कामगिरीची अपेक्षा भारतीय कुस्तीप्रेमी बाळगून असतील. राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक पदके भारताने कुस्तीमध्ये जिंकली होती. त्यामध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कास्यपदकांचा समावेश होता.

भारताने आशियाई स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेनंतर सर्वाधिक पदके जिंकली आहेत. आतापर्यंत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 56 पदके कुस्तीतच जिंकली आहेत. गेल्या आशियाई स्पर्धेत कुस्तीत योगेश्वर दत्तने एकमेव सुवर्णपदकांची नोंद केली होती. यंदा बजरंग पुनियाकडून सुवर्णपदकाची आशा बाळगायला हरकत नाही. यंदाच्या मोसमात तो चांगलाच फॉर्मात असून, त्याने 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धात सुवर्णपदके जिंकली आहेत. जकार्ता येथे 65 किलो वजनी गटात सहभागी होणार्‍या बजरंगकडून पहिला क्रमांक अपेक्षित आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणार्‍या सुशील कुमारकडून देखील पदकांच्या मोठ्या आशा आहेत. संदीप तोमर, पवन कुमार, मोसम खत्री, विघ्नेश फोगट, साक्षी मलिक, पिंकी हेदेखील पदकांचे प्रमुख दावेदार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ

मुंबई  – मुंबई पालिकेने आता आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी धरण परिसरातील घरगुती, व्यावसायिक पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसा प्रस्ताव तयार करून...
Read More
post-image
महाराष्ट्र

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करण्याची मागणी

पुणे – जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने ‘मेगाभरती’ रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला...
Read More
post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More