भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले; 29 नोव्हेंबरला विशेष बैठक – eNavakal
क्रीडा देश

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले; 29 नोव्हेंबरला विशेष बैठक

नवी दिल्ली- भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) आगामी निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग येत आहे. 29 नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सरचिटणीस या दोन पदांच्या निवडीचे पात्रता निकष काय असावेत यावर चर्चा घडेल.
निवडणुकीसाठी 14 डिसेंबर ही तारखी ठरली आहे. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनपर्यंत असेल. विद्यमान अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी निवडणूक शर्यतीत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरींदर बात्रा, विद्यमान खजिनदार आणि टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल खन्ना हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. खजिनदारपदासाठी तीन जण अर्ज भरण्याची शक्‍यता आहे.
आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले की, चेन्नईत नऊ नोव्हेंबरला पार पडलेली कार्यकारिणीची बैठक तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून (आयओसी) मिळालेल्या पत्रानुसार विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. आयओए घटनेच्या तरतुदीत 2013 मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार कलम 11-1-क आणि कलम 31-इ याविषयी चर्चा करून योग्य अर्थ काढणे हा विषयपत्रिकेवरील मुख्य मुद्दा आहे.
कलम 11-11- क नुसार आधीच्या कार्यकारिणीचे सदस्य असणे आणि पद भूषविणे अध्यक्ष व सरचिटणीसपदाच्या उमेदवारीसाठी बंधनकारक आहे. कलम 31- इनुसार घटनेचा अर्थ आणि ती लागू करण्याविषयी सर्व मुद्यांवर तसेच विषयपत्रिकेत समाविष्ट नसलेल्या मुद्यांवर सर्वसाधारण सभेचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

वाढता वाढे आकडा! मुंबईत कोरोनाचे ४३३ रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताही वाढत जातेय. त्यातच मुंबईकरांसाठी रोज धडकी भरवणारे आकडे समोर येत असल्याने मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या...
Read More
post-image
देश

पाकिस्तानात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेच केली सेक्सची मागणी

इस्लामाबाद – कोरोनाविरोधात आरोग्य सेवकांकडून अहोरात्र मेहनत सुरू आहे. मात्र या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफना मात्र कोरोनाबाधित लोकांकडून त्रात होत आहे. काही ठिकाणी...
Read More
post-image
देश

आम्हाला तुमचा अभिमान, पाकिस्ताननं केली भारताची स्तुती

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत केली आहे. एअर इंडियानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे, जीवनावश्यक...
Read More