भारतासमोर ‘व्हॉईटवॉश’ टाळण्याचे आव्हान – eNavakal
क्रीडा देश विदेश

भारतासमोर ‘व्हॉईटवॉश’ टाळण्याचे आव्हान

जोहान्सबर्ग – भारतीय संघ आजपासून (बुधवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला सामोरा जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचा टीम इंडिया संघ व्हॉईटवॉशची नामुश्की टाळणार का? याची उत्सुकता भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याबाबत आहे.

सलग 8 मालिका जिंकून विराटचा संघ आफ्रिकेत दाखल झाला होता. गेल्या 25 वर्षात टीम इंडियाला आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाने नेहमीच हुलकावणी दिली होती. यावेळी हे चित्र बदलेल, असे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटत होते. पण विराट आणि त्याचे सहकारी नवा इतिहास रचण्यास अपयशी ठरले. भारतीय संघाला केपटाउन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला, तर सेंच्युरियनला झालेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताला १३५ धावांनी नमविले. मायदेशात अधिराज्य गाजविणाऱ्या भारतीय संघाची कसोटी बघणारा हा दौरा ठरला. भक्कम फलंदाजी ही टीम इंडियाची खरी ताकद समजली जाते. पण आफ्रिकेतील उसळी घेणार्‍या आणि चेंडू स्वींग होणार्‍या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज साफ अपयशी ठरले. त्यामुळेच मालिकेचा निकाल आफ्रिकेच्या बाजूनेच लागला. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत कमवले. पण भारतीय फलंदाजांनी त्यावर पाणी फेरले, असे भारताच्या पराभवाबाबत म्हणता येईल.

चुकीच्या संघ निवडीचा फटकादेखील टीम इंडियाला बसला. आता शेवटच्या कसोटीत बरेच बदल भारतीय संघात अपेक्षित आहे. अंतिम संघ कोणता निवडावा याबाबत मोठा पेच संघ व्यवस्थापनासमोर आहेत. भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी केली तरच या मालिकेत व्हाईटवॉशची नामुश्की टीम इंडिया टाळू शकेल. ही खेळपट्टीदेखील वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. भारतीय संघाची या मैदानवरची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. सुदैवाने भारताने येथे एकही पराभव बघितलेला नाही. एक कसोटी सामना भारताने येथे जिंकला आहे. त्या विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघ करतो का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More