भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा

श्रीनगर – नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनचं ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे.

सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याचा विश्वास आहे. बोगदा बनवून दहशतवाद्यांनी सीमा ओलांडल्याची ही पहिली घटना नाही.

गुरुवारी नगरोटाजवळ जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत ठाक झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. मोठा घातपात करण्याची योजना हे दहशतवादी आखत असल्याची शक्यता आहे. हे चौघे काश्मीरकडे जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविला आणि त्यानंतर चकमकीत हे चौघे ठार झाले.

गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांना घेऊन जाणारा ट्रकला थांबवून ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यानं पळ काढायला सुरुवात केली. पोलिसांच्या पथकावर ट्रकच्या आतून गोळीबार झाला. मग प्रत्युत्तरात जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तूल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी कमीतकमी 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर यंदाची ही दुसरी चकमकी होती. यापूर्वी जानेवारीमध्ये सुरक्षा दलाने 3 दहशतवादी ठार मारले होते. तेही अशाचप्रकारे ट्रकच्या आत लपून जात होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतात घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी बनवला बोगदा; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा खुलासा

श्रीनगर – नगरोटा चकमकीचा तपास करणार्‍या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

तीन जिवलग मित्रांची सामूहिक आत्महत्या

शहापूर – जीवलग मित्रांच्या आत्महत्या ही तिघांनी ‘मोक्ष’ मिळवण्यासाठी केली असल्याची चर्चा शहापूरमध्ये सुरू आहे. या तिघांनी अमावशेच्या दिवशीच एकाच साडीने झाडाला गळफास लावून...
Read More
post-image
मनोरंजन

‘नाळ’मधील चैत्या ‘छुमंतर’, लंडनमध्ये चित्रीत झालेला सिनेमा लवकरच येणार

लॉकडाऊन शिथील झाल्यावर आणि सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी मिळाल्यानंतर अनेक सिनेमांच्या, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मराठी सिनेमांनी देखील अनेक ठिकाणी जाऊन योग्य ती काळजी घेऊन चित्रिकरण...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात शनिवारी खबळबळ उडवून देणारी घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक! दोघांना अटक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी तुटलेल्या काचेच्या भंगारातून लाखो रुपयाची दारू वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड व उत्तरप्रदेश येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.त्यांच्याकडून तब्बल...
Read More