भारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला ‘आशिया’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारताच्या युवा खेळाडूंनीही जिंकला ‘आशिया’

बांगलादेश – वरिष्ठ संघापाठोपाठ भारताच्या युवा क्रिकेट संघानेही सलग सहाव्यांदा आशिया (19 वर्षांखालील) चषकावर नाव कोरले आहे. बांगलादेश येथे खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा शिलेदारांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 144 धावांनी धुव्वा उडवला. भारताच्या 304 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 1989, 2003, 2012, 2013-14 आणि 2016 मध्ये जेतेपद जिंकले होते.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 3 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. यशस्वी जैस्वाल (85) आणि अनुज रावत (57) यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर जैस्वाल आणि देवदत्त पडीक्कल (31) यांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार प्रभ सिमरन सिंग (नाबाद 65) आणि आयुष बदोनी (नाबाद 52) यांनी जोरदार फटकेबाजी केली.

दोघांनी 54 चेंडूत 100 धावा कुटल्या. बदोनीने 24 चेंडूंत 50 धावा केल्या. भारताच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ 30 षटकांत 121 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर श्रीलंका संघाची पडझड सुरुच राहिली. भारताच्या हर्ष त्यागीने 38 धावा देत सहा विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून नवोदू दिनूश्री (48), निशान मदुष्का (49) आणि डॉन पसिंदू संजूला (31) यांनी संघर्ष केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More