भारताच्या महान नेत्याला आपण मुकलो – अडवाणी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारताच्या महान नेत्याला आपण मुकलो – अडवाणी

नवी दिल्ली – अटलजी माझ्यासाठी एक वरिष्ठ सहकारी तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ ते माझे मित्र होते. आज त्यांच्या निधनाची बातमी आली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. हे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. भारताच्या सर्वात महान नेत्यांमध्ये ज्यांचे नाव घेतले जाते अशा नेत्याला आपण आज मुकलो आहोत असे उद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने आज एम्स रूग्णालयात ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. त्यानंतर अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

आज माझ्या मनात हजारो प्रश्नांनी काहूर माजला आहे. वाजपेयींसोबतच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येत आहेत, हे बोलून अडवाणी भावूक झाले. पुढे अडवाणी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक प्रचारक म्हणून आम्ही एकत्र काम केले. भारतीय जनसंघाची स्थापना, आणीबाणीच्या वेळचा संघर्ष, भाजपाची स्थापना या सगळ्या प्रवासात आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले.  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कारकीर्द देश कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दात अडवाणींंनी वाजापेयींंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

पुणे – पंढरपूरचे ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्त्व करणारे दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात काल रात्री साडे अकराच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत ७५३, पुण्यात १,८२९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्या पार

मुंबई – महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ८ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले. तर २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ११ हजार ३९१ जणांनी कोरोनावर यशस्वी...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More