भारताचे बलशाली अभिनंदन ताठ मानेने सीमेवर पोहोचले – eNavakal
देश

भारताचे बलशाली अभिनंदन ताठ मानेने सीमेवर पोहोचले

नवी दिल्ली – भारताच्या लष्करी तळांवर हल्‍ला करण्यासाठी भारताच्या हद्दीत घुसणार्‍या पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-16 विमानाचा पाठलाग करून त्याचा खात्मा करणारे भारताचे विंग कमांडर अभिनंदन आज ताठ मानेने भारत-पाक सीमेवर येऊन पोहोचले. भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला त्यांना विनाअट मुक्‍त करावे लागले.

भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना काल पाकिस्तानातील भारतीय दूतावासाकडे सोपविले. यानंतर दूतावासाकडून आवश्यक कागदपत्रे पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडे पाठविण्यात आली. अभिनंदन यांना आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसच्या हवाली केले गेले. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांचा इस्लामाबाद ते लाहोरहून वाघा बॉर्डरचा प्रवास सुरू झाला. ते संध्याकाळी 4.30 वाजता वाघा बॉर्डरवर पोहोचले. तेथे त्यांची खूप वेळ वैद्यकीय तपासणी चालली होती त्यानंतर कागदांचे आदानप्रदान करण्यात आले. पाकिस्तानच्या वाघा बॉर्डरवर अभिनंदन पोहोचल्याचे समजताच भारतीय सीमेवर ढोल-ताशांचा दणदणाट आणि फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.

आज सकाळपासून अटारी बॉर्डरवर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. पंजाब पोलीस व सीमा सुरक्षा दल तैनात होते. ढोल-ताशा आणि देशभक्‍तीपर गीतांनी रोमांच उठले होते. अभिनंदन यांचे आईवडील आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. गुरुवारी रात्री अभिनंदनचे आई-वडील दिल्लीला येत असताना विमानातील सहप्रवाशांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More