भारताची पाणबुडी पाक हद्दीत? पाकचा नवा दावा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश विदेश

भारताची पाणबुडी पाक हद्दीत? पाकचा नवा दावा

नवी दिल्ली – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर तणाव वाढलेला असताना पुन्हा एकदा पाकिस्तानकडून दावा करण्यात आला आहे. एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला असल्याचा दावा आज पाकिस्तानच्या नौदलाने केला आहे. मात्र या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पाकिस्तान रोज नवनवे दावे करत आहे. पाकिस्तानच्या नौदलाने आज दावा केला की 4 मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडीने घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याबाबतचं वृत्त ‘डॉन’ने दिलं आहे. याबाबत पाकिस्तानी नौदलाकडून एक व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र ज्या क्षेत्राला पाकिस्तान आपली सीमा म्हणत आहे, तो भाग आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात येतो. आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र असल्याने तेथे पाकिस्तानला भारतीय पाणबुडी ताब्यात घेण्याचा वा सोडण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पाकिस्तानचा हा दावा आणि फुटेजही फुसका बार असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More