भारताची अर्थव्यवस्था मंदावली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

भारताची अर्थव्यवस्था मंदावली

नवी दिल्ली – केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार देशाचा विकास झाल्याचे ढोल दरदिवशी बडवत असते. मात्र सर्व सोंगे करता येतात परंतु पैशाचे सोंग करता येत नाही. मोदींच्या विकासाचा हा फुगा फुटला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2018-2019 च्या तिसर्‍या तिमाहीत विकास दर 6.6 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा दर 8 टक्के तर दुसर्‍या तिमाहीत 7 टक्के होता.

भारताचा विकास दर गेल्या 2 वर्षांत सतत घसरत आहे. त्यामुळे 2018-19 च्या अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 7 टक्के वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी ही अंदाजित वाढ 7.2 टक्के एवढी वर्तविण्यात आली होती. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांच्या खरेदीत म्हणजेच क्रय शक्‍तीत साधारण वाढ झाल्याची चिन्हे दिसत असली तरी त्याची गती खूप मंद आहे.

बांधकाम व्यवसाय, रियल इस्टेट, उपयुक्‍त सेवा क्षेत्र आणि आर्थिक व्यवहार या क्षेत्रात अधिक वाढ होण्याची शक्यता असली तरी मुख्य उत्पादन क्षेत्राची वाढ मंदावली आहे. शेतमाल उत्पादन क्षेत्राची वाढही यापूर्वीच्या तिमाही पेक्षा कमी आहे. पूर्वीच्या तिमाही 4.6 टक्के वाढ होती. या तिमाहीत ती 2.7 टक्के म्हणजे निम्म्याने खाली आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More