भाजप सरकारच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी लावली उपस्थिती – eNavakal
News देश

भाजप सरकारच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी लावली उपस्थिती

गुरुग्राम- हरयाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आज उपस्थिती लावली. यापूर्वी प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आज मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत प्रणवदा व्यासपीठावर एकत्र दिसले. प्रणव मुखर्जी फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी मुखर्जी हे मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत एका मंचावर एकत्र आले. मुखर्जी यांनी या कार्यक्रमासाठी 15 वरिष्ट आणि काही ज्यूनिअर पातळीवरील आरएसएसच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण दिलं होतं. आणि आरएसएसच्या सदस्यांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासनही दिल्याचे सांगण्यात येतय. दरम्यान, या कार्यक्रमानंतर मुखर्जींच्या कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं. प्रणव मुखर्जी फाऊंडेशन आरएसएससोबत कुठलंही काम करत नाहीए आणि पुढील काळात तशी कुठलीही फाऊंडेशनची योजना नाही, असं त्यातून सांगण्यात आलं. स्मार्ट गाव योजनेनुसार दत्तक घेतलेल्या गावांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम प्रणव मुखर्जी फाऊंडेशन करत आहे. यानुसार नागरिकांना प्रशिक्षण देणं, पाण्यासाठी एटीएम बसवणं आणि वैशिष्ट्यपूर्ण गोदामं सुरू करण्यात येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More