भाजप नेत्याकडून परिवहन विभागाच्या अधिकारयाला मारहाण – eNavakal
गुन्हे देश राजकीय

भाजप नेत्याकडून परिवहन विभागाच्या अधिकारयाला मारहाण

लातेहर – झारखंडमधील एका भाजपा नेत्याने परिवहन विभागाच्या एका अधिकार्‍याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नेत्याच्या चार चाकी वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी हा अधिकारी गेला होता. त्याचवेळी या भाजपा नेत्याने शिवीगाळ करत त्या अधिकार्‍याला मारहाण केली. हा व्हिडिओ झारखंडमधील लातेहर जिल्ह्यातील असल्याचे समजते.
सरकारी आदेशानुसार काल परिवहन अधिकारी एफ. बारला हे भाजपा नेते राजधानी यादव यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयानजीक उभ्या असलेल्या वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी गेले होते. बारला हे कर्मचार्‍याकडून ती नेमप्लेट काढून घेत असल्याचे व्हिडिओत दिसते. त्याचवेळी यादव हे पळत-पळत आले आणि त्यांनी थेट बारला यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. कोणाच्या आदेशाने ही नेमप्लेट काढत आहे, असा जाब यादव हे बारला यांना विचारत होते. त्यांनी बारला यांच्या तोंडावर ठोसे लगावल्याचे व्हिडिओत दिसते.
या घटनेनंतर अधिकार्‍यांनी राजधानी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यादव यांना अटक न केल्यास कर्मचार्‍यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More