भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय-गडकरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

भाजप नेतृत्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय-गडकरी

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून मी पाहत आहे की, मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून आणि प्रसिद्धी माध्यमातील ठराविक गटांकडून होताना दिसत असल्याचे ट्विट करत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

भाजप नेतृत्त्व आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्याचा आणि भाजप पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहेत. मी अशा गोष्टी बारकाईने तपासण्याचा प्रयत्न करत असून वेळोवेळी अशा गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. माझ्या वक्‍तव्याची अशी मोडतोड करून भाजप नेतृत्व आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधकांचा हेतू कधीच साध्य होणार नसल्याचे गडकरी  यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात  उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नागरी बँकांचा गौरव गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी गडकरी म्हणाले, यशाचे श्रेय घेण्यासाठी सर्व असतात, मात्र अपयश आले की दुसर्‍याकडे बोट दाखवितात. निवडणुकीमध्ये हरल्यानंतर मी पैसे मागितले होते, दिले नाहीत. सभा मागितली होती, सभा दिली नाही, असे सांगतात, मात्र तू आणि तुझा पक्ष लोकांची विश्वासार्हता संपादन करण्यात कमी पडला हे ते विसरतात. त्यामुळे अपयशाचेही श्रेय घेण्याची वृत्ती नेतृत्त्वात असायला हवी, असे वक्तव्य तीन राज्यांतील पराभवांच्या पार्श्‍वभूमीवर गडकरींनी केल्यानंतर राजकीय वर्तृळात मोदी आणि गडकरींबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई – राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ६६१ रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडत १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ६६१ रुग्णांची...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकीय

धारावी कोरोनामुक्तसाठी राजकीय श्रेयवाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मुंबई – दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. मात्र त्यामुळे राज्यात आता नवा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावर जाग येणार का? सिब्बलांचा थेट सवाल

नवी दिल्ली – राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

लॉकडाऊनआधीच पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी स्विकारला पदभार

पुणे – पुण्यात उद्या १३ जुलैपासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. त्याआधीच पुण्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्विकारला आहे. वाचा – धारावी...
Read More