भाजप नगरसेवक महेश पाटीलना ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र राजकीय

भाजप नगरसेवक महेश पाटीलना ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात

कल्याण – भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी  1 कोटी रुपयांची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल केले आहेत . हे प्रकरण सद्या गाजत असतानाच उच्च न्यायालयाने नगरसेवक महेश पाटील यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना कल्याण न्यायालयात हजर राहण्याचश आदेश दिले त्यानुसार महेश पाटील आपले साथीदार सुजित नलावडे व विजय बाकाडे सह कल्याण न्यायालयात हजर झाले होते यावेळी ठाणे खंडणी विरोधी पथकाने न्यायालयाला विनंती करत तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे .दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसानी कल्याण न्यायालय आणि आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने या परिसराला छावणी चे स्वरूप आले होते.

ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनि गेल्या महिन्यात भिवंडी नजीक  गणेशपुरी परिसरात झालेल्या दरोड्या प्रकरणी आठ आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 1पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुसं यासह3 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम एवढा ऐवज जप्त केला .दरम्यान आरोपींची चौकशी सुउर असताना अटक आरोपींमधील एकाने  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे भाजप नगरसेवक महेश पाटील याने भाजप समर्थक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठीतब्बल १ कोटींची सुपारी दिल्याची कबुली देत यामधील १० लाख रुपये दिल्याचे माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती .ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाअंती गणेशपुरी पोलिस स्टेशन मध्ये भादंवि कलम 120 ब , 302 सह 115 व आर्म्स ऍक्ट 325 अंतर्गत नगरसेेेवक महेश पाटील , सुजित नलावडे , यांच्यासह इतर ११ जणांवर गुन्हे दाखल केला .दरम्यान हे प्रकरण डोंबिवली मानपाडा पोलिसाकडे वर्ग करण्यात आले त्यानंतर या प्रकरनाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला .याच दरम्यान  नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय बाकाडे यांनी जामिनासाठी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून  लावल्याने त्यांनी उच्च नाययलायत धाव घेत जामीन अर्ज केला होता .उच्च न्यायालयाने ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत कल्यान जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले अखेर  आज भाजप नगरसेवक महेश पाटील आपले साथीदार सुजित नलावडे व विजय बाकाडे यांच्यासह कल्याण न्यायालयात हजर झाला .यावेळी ठाणे खंडणी विरोधी पथकाने

न्यायमूर्ती वानखडे यांच्या कडे आरोपींचा ताबा देण्यासाठी विनंती केली  असता न्यायालयाने खंडणी विरोधी पथकाला कडे ताबा दिला .ठाणे खंडणी विरोधी पथकाने महेश सह त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले .या बाबत ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख राजकुमार कोथमिरे यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील याने दिली होती .त्यामधील सात आरोपी यापूर्वी अटक केले आहेत तर तीन आरोपीनि जामीनासाठी हाय कोर्टात धाव घेतली होती हाय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज रद्द करत त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.त्या प्रमाणे हे आरोपी न्यायालयात हजर झाले होते आम्ही न्यायालयाला आरोपींची कस्टडी मिळावी विनंती केली होती त्या प्रमाणे आरोपींची कस्टडी मिळाली आहे आम्ही आता त्यांना ताब्यात घेतले असून उद्या कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More