भाजप खासदाराचा गौप्यस्फोट; फडणवीसांनी 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

भाजप खासदाराचा गौप्यस्फोट; फडणवीसांनी 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले

नवी दिल्ली – भाजपा नेते अनंत कुमार हेगडे यांनी महाराष्ट्राच्या सत्तानाट्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला. इतकेच नाही तर भाजपाने ही योजना आधीपासून आखली होती. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला, असा दावाही अनंतकुमार हेगडे यांनी केला.

ते म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांना राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत.’ मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला’, असा गौप्यस्फोट हेगडे यांनी केला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More