भाजपा मंत्र्यांच्या घरासमोर सोलापुरात ‘आसूड ’आंदोलन – eNavakal
News महाराष्ट्र

भाजपा मंत्र्यांच्या घरासमोर सोलापुरात ‘आसूड ’आंदोलन

सोलापूर – मागील सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने आज सोलापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्यात आले.

सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन सुरू असताना अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. तरीही भरपावसात मराठा समाजाचे नेते जोरजोरात भाषण करताना दिसत होते. पावसात चिंब भिजूनही आंदोलनाची धार कमी झाली नव्हती. या आंदोलनामुळे शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला होता. डफरिन चौकाकडून जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणावरून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांसाठी फक्त एकेरी वाहतूक सुरू होती. होटगी रस्त्यावर महिला हॉस्पिटल चौकापासून बॅरिगेट्स लावण्यात आले होते. आंदोलक सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर आल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हेही आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी त्याठिकाणी भाषणही केले. कुणी राजीनामा देवो किंवा न देवो आम्ही मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमच्या नगरसेवक पदाचा सोमवारी राजीनामा देत आहोत अशी घोषणा यावेळी नगरसेवक अमोल शिंदे व विनोद भोसले यांनी केली. आणि आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणेने आसमंत दणाणून सोडला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More