भाजपा प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी – eNavakal
महाराष्ट्र

भाजपा प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटील सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी

मुंबई – आज भाजपाची तिसरी मेगा भरती पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांच्यासह कॉंग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह आणि सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील हे भाजपावासी होणार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्यापूर्वी आज सकाळी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. भाजपा प्रवेशाबाबत सांगताना कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गेली अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये घुसमट झाली. त्यामुळे लोकांच्या विकासाकरिता हा निर्णय घ्यावा लागला. अडचणीत असताना कॉंग्रेसमधील मागे कोणीही उभे राहत नाहीत, वाऱ्यावर सोडून दिले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार भाजपात प्रवेश करत आहे. आम्ही कोणाला फसवून, अन्याय करून भाजपात जात नाही, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघांचे सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्याने नाराज पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More