भाजपा नेत्यांच्या अनधिकृत व्यावसायिक बांधकामांकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

भाजपा नेत्यांच्या अनधिकृत व्यावसायिक बांधकामांकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पिंपरी – भाजप नेते, लोक प्रतिनीधी, नगरसेवक हे त्यांची व्यावसायिक अनधिकृत बांधकामे शाबूत ठेऊन सर्वसामान्यांच्या रहिवासी बांधकामावर कारवाई केली जात आहे. महापालिका ही जाणीवपूर्वक या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे.
पिंपरी येथे अनधिकृत बांधकामाच्या कारवाई विषयी माहिती देण्यासाठी आज (रविवारी) पत्रकार परिषद आयोजीत केली होती या परिषदेत जगताप बोलत होते. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले की, राज्य सरकारने 2015 नंतर अनधिकृत बांधकामे होतील ती नियमीत केली जाणार नाहीत असा अध्यादेश काढला असतानाही नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ही सर्व बांधकामे व्यावसायिक असून यामध्ये रहिवासी एकही बांधकाम नाही. तरी देखील महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कारण या सर्व बांधकामांना भाजपा लोकप्रतिनीधींचे अभय आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडे 2007 ते 2017 या कालावधीतील अनधिकृत बांधकामांची माहिती मागवली असता प्रशासनाने केवळ ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 दरम्यानची माहिती दिली. मात्र इतर माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचाच अर्थ की प्रशासनावरही दडपशाही केली जात आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात केवळ 24 अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ग्रीन झोन, पूर रेषा या भागातही चार ते पाच मजली इमारती उभ्या आहेत. तरीही महापालिका याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करत आहेत.
शास्तीकर माफीचे निवडणूकीत दिलेले आश्वासन ही सत्ताधा-यांनी पाळले नाही. सर्वसामान्य नागरिक दरवर्षी शास्ती भरू शकणार नाही. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे सुरुच आहेत. ही शहरासाठी गंभीर बाब आहे. राज्य सरकारने यावर त्वरीत उपाय योजना करावी अन्यथा याविषयी न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More