भाजपा कमिटीची दुपारी ४ वाजता आणखी एक बैठक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

भाजपा कमिटीची दुपारी ४ वाजता आणखी एक बैठक

मुंबई – विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी भाजपाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण राज्यपालांनी भाजपाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपा कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘भाजपा कोअर कमिटीची सत्ता स्थापनेच्या निमंत्रणाबाबत चर्चा झाली आहे. मात्र दुपारी चार वाजता पुन्हा एक बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर राज्याच्या जनतेला व राज्यपालांना निर्णय कळविण्यात येईल’, अशी माहिती दिली. त्यामुळे ४ वाजता होणाऱ्या बैठकीत भाजपा अंतिम निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सत्तास्थापनेचा दावा भाजपाने केला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील आणि नंतर बहुमत सिद्ध करतील. जर भाजपा बहुमत सिद्ध करू शकली नाही तर त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल शिवसेनेला निमंत्रित करू शकतात. त्याचवेळी आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही असेही पत्र भाजपा राज्यपालांकडे पाठवू शकते. भाजपाने असमर्थता दाखविली तर शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले जाईल. १८ अपक्ष आमदारांचा आम्हाला पाठींबा असल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेचे सर्व मार्ग फसले तर राष्ट्रपती राजवट व नंतर पुन्हा निवडणुका ही प्रक्रिया आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More