भाजपा एकाचवेळी कुर्‍हाड-फावडं पायावर मारून घेणार नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

भाजपा एकाचवेळी कुर्‍हाड-फावडं पायावर मारून घेणार नाही

नाशिक – लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाणार नाहीत. कारण दोन्ही निवडणुका एकत्र घेणे म्हणजे भाजपसाठी कुर्‍हाड-फावडं एकाचवेळी मायावर मारून घेण्यासारखे आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे हे दौर्‍यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, नुकत्याच पाच राज्यांत झालेला भाजपाचा पराभव हा जनतेचा मोदींवरील राग आहे. हा रागच मतांमधून बाहेर पडला आहे. खरे तर मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचवेळी स्वत:साठी खड्डा खणला होता. राज्यातील भाजपा-सेना सरकारवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. हे सरकार खोटारडे आहे. आघाडी सरकारपेक्षा बेकार आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपा आणखी चुका करत राहणार आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे ते प्रमाण वाढतच राहील. कारण आधी नोटाबंदी, जीएसटी लादून लोकांचे पैसे काढले. आता लोकांच्या घरात घुसणार का? असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारच्या मोबाईल आणि संगणकाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More