भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात – eNavakal
देश राजकीय

भाजपाच्या बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात

कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. या “घरवापसी” आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून भाजपाचे बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर कोलकात्याचे 16 नगरसेवकही तृणमूल काँग्रेसमध्ये परत जाण्याच्या मनस्थितीत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भाजपाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र भाजपाच्या पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदावरून भाजपा नेत्यांमध्येच युद्ध सुरू झाले आहे. भाजपा नेते दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. या सत्ता संघर्षाची कल्पना दिल्लीतील भाजपा नेत्यांना आली आहे. मात्र त्यांनी अजून कुठचीही कारवाई केलेली नाही. सध्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे तिखट जिभेचे आहेत. त्यातही जे नेते तृणमूल काँग्रेस सोडून भाजपात आलेले आहेत त्यांना ते फारशी किंमत देत नाहीत व त्यांना टाकून बोलतात. त्यामुळेही 4 खासदारांसहीत 21 आमदार व नेते पुन्हा स्वगृही तृणमूल काँग्रेसमध्ये परत प्रवेश घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्याबाबत त्यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणे झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे काम पाहणारे भाजपा नेते कैलास विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेसचा भाजपा नेते व खासदार आमदार फुटण्याचा दावा फोल ठरविला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांची तहान भागली! सात धरणांमध्ये नऊ महिने पुरेल इतका पाणीसाठा

मुंबई – धरणात मुबलक पाणीसाठा नसल्याने ऐनपावसाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांनी तहान भागवणारे...
Read More
post-image
मनोरंजन

‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – सध्या सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे. बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असणाऱ्या गणेशभक्तांना  यंदाच्या गणेशोत्सवात खास बाप्पावर असलेल्या एका लघुपटाची मेजवानी मिळणार आहे. भावेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (73) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून ते कोरोनाशी झुंज देत होते. अखेर आज...
Read More
post-image
महाराष्ट्र

90 टक्के चाकरमानी कोकणात पोहोचल्यावर बस-ट्रेन सुरु, ही तर चेष्टाच, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई – गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

एमएसएमई क्षेत्रात ५ कोटी नवे रोजगार निर्माण करणार, नितीन गडकरींचे आश्वासन

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात अर्थचक्र बंद पडल्याने बेरोजगारांचीही संख्या वाढली. तसेच, अनेक उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेला आलेली ही मरगळ दूर करण्यासाठी...
Read More