भाजपाचे सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचे गाजर – eNavakal
देश

भाजपाचे सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचे गाजर

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने सवर्ण समाजाला नोकरी व शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचे गाजर दाखविले. त्यासाठी भारतीय राज्य घटनेत दुरुस्ती केली. मात्र दिल्लीत मोदी पंतप्रधान झाल्यापासून सरकारी नोकरीतील 75,231 रिक्त जागा भरलेल्याच नाहीत. या जागा भरल्या असत्या तर 10 टक्के आरक्षण देण्याची गरजही भासली नसती.

काँगे्रसचे केंद्रातील सरकार होते तेव्हा 1 मार्च 2014 रोजी केंद्र सरकारी कर्मचार्‍यांची संख्या (लष्कर वगळता) 33 लाख 30 हजार होती. ती आता 32 लाख 52 हजारांवर आली आहे. मोदी सरकारने त्यांच्या गेल्या चार अर्थसंकल्पात नोकर भरतीचे आश्‍वासन दिले. तसेच दरवर्षी ठराविक नोकरसंख्या वाढविण्याचा आकडाही जाहीर केला. जर मोदी सरकारने प्रामाणिकपणे दरवर्षी नोकरभरती केली असती तर गेल्या चार वर्षांत 2 लाख 50 हजार नोकर्‍या वाढल्या असत्या.

केंद्र सरकारने देशव्यापी नोकरभरती करण्याऐवजी सरकारच्या 55 मंत्रालयांची कामे कंत्राटी पद्धतीने दिली. काही ठिकाणी निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवले जात आहे. एकट्या रेल्वे खात्यात 23,000 जागांची कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने फक्‍त पोलीस दलात भरती सुरू ठेवली आहे. बाकी सर्व खात्यातील नोकरभरती थांबली आहे. तरीही मोदी सरकार 10 टक्के आरक्षणाचे गाजर दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More