भाजपाचेच आमदार फुटणार! जेडीएसच्या संपर्कात – eNavakal
News देश

भाजपाचेच आमदार फुटणार! जेडीएसच्या संपर्कात

बंगळुरू – ज्याच्यासाठी खड्डा खणावा त्याच खड्ड्यात स्वतः पडावे, अशी भाजपाची अवस्था झाली आहे. काँग्रेस – जेडीएसचे आमदार फोडता फोडता आता भाजपाचेच 4 आमदार भाजपाला सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील फाटाफूट टाळण्यासाठी भाजपाने आपल्या आमदारांना 3 रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. भाजपाचे हे चार आमदार जेडीएसच्या संपर्कात असल्यानेच आज कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याची घोषणा करताच येदुयुरुप्पा यांचा चेहरा पडला व ते विधानसभेतून निघून गेले.
भाजपाचे 4 आमदार गळाला लागल्यानेच आज कर्नाटकाचे जेडीएसचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत आपण बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, अशी घोषणा केली. त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याची वेळ मागितली. अध्यक्षांनी याबाबत अजून निर्णय दिलेला नाही.
आतापर्यंत काँग्रेस व जेडीएसचे 18 आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी 11 जणांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांना पुन्हा सादर केले आहे. काल विधानसभा अध्यक्ष के.आर.रमेशकुमार यांनी या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर कुठचाही निर्णय देण्याचे टाळले. त्यानंतर या बंडखोरांपैकी 10 आमदार मुंबईत परत आले. त्यापैकी 3 आमदार पुन्हा बंगळुरूमध्ये परतले आहेत. या आमदारांच्या राजीनाम्याबाबतचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत पुढील मंगळवारी सुनावणी घेणार आहे.
दरम्यान, आपापले आमदार घोडेबाजारापासून सुरक्षित रहावेत यासाठी सर्व पक्षांनी रिसॉर्ट बुक केले आहेत. काँग्रेसने क्लार्कस एक्झोटिका रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. तर भाजपाचे आमदार 3 रिसॉर्टसमध्ये तर जेडीएसचे 34 आमदार दोन रिसॉर्टमध्ये राहत आहेत. कर्नाटकात दगाफटक्याचे राजकारण रंगले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More