भाजपविरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल! आठवलेंचे सुतोवाच – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

भाजपविरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल! आठवलेंचे सुतोवाच

पंढरपूर- रिपाइंचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपविरोधातील तिसर्‍या आघाडीवर वक्तव्य केले. ‘कर्नाटक राज्यातील निवडणुकीनंतर कुमारस्वामी यांच्या शपथविधीला देशातील भाजप विरोधी सर्व पक्षाचे प्रमुख एकत्र आले. त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजप विरोधी पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून लढण्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही तिसरी आघाडी अपयशी ठरेल, कारण त्या-त्या राज्यात स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत. ते कदापी एकत्र येऊ शकणार नाहीत, असे सूतोवाच आठवले यांनी यावेळी केले.
रामदास आठवले म्हणाले की, तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिले आहे. मात्र यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मागे पडतील. शिवाय अनेक राज्यातील स्थानिक पक्षांमध्ये मतभेत आहेत. त्यामुळे भाजप विरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात. युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.

भिडे गुरुंजीवर कारवाई व्हावी
नंदूरबार येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे गुरुजी यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी केली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More