भाईंदरमध्ये स्वच्छता मोहीम; रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी – eNavakal
महाराष्ट्र

भाईंदरमध्ये स्वच्छता मोहीम; रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी

भाईंदर – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मोठया प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या आणि गर्दी न करण्याच्या सूचना वारंवार केल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात येतेय. ठाणे जिल्ह्यातील भाईंदर परिसरात आज दुपारी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. भाईंदरच्या प्रभाग क्रमांक ११च्या रस्त्यांवर करण्यात आलेल्या या फवारणीवेळी नगरसेवक आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील स्वतः उपस्थित होते. या प्रभागात जवळपास ३०० सोसायटी आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सॅनिटायझर फवारणी करून सर्व रस्ते स्वच्छ करण्यात आले असून या भागात दर सात दिवसांनी औषध फवारणी करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि एकटेच जाऊन त्वरित घरी परता’, अशी विनंती त्यांनी यावेळी नागरिकांना केली. ते म्हणाले, ‘तुम्ही घराबाहेर पडला नाहीत, तर तुमच्या घरात कोरोना येणार नाही. मात्र भाजीपाला, औषधे आणण्यासाठी आपण घराबाहेर पडणार असाल तर प्रत्येक इमारतीच्या गेटवर सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन काळात नागरिकांसाठी या भागात विशेष भाजीपाला मार्केट सुरू करण्यात येणार आहे. या मार्केटमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी दोन विक्रेत्यांमध्ये योग्य अंतर असेल, येत्या एक-दोन दिवसांत हे मार्केट सुरू होणार असून त्यासाठी महापालिकेकडे मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

आतापर्यंत भाईंदरमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे खबरदारी म्हणून १११ जणांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे, मात्र यापैकी एकही जण अद्याप कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. तसेच बाहेरगावाहुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

भाईंदरच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये स्वच्छता मोहीम

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More