भाईंदरच्या ‘वी अनबीटेबल’चा अमेरिकेत डंका – eNavakal
देश विदेश

भाईंदरच्या ‘वी अनबीटेबल’चा अमेरिकेत डंका

पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि भाईंदरने देशाला अनेक डान्सर दिले आहेत. याच भाईंदर भागातील डान्स ग्रुप ‘वी अनबीटेबल’ने आंतरराष्ट्रीय नकाशावर भारताचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले. या ग्रुपने अमेरिकाज गॉट टॅलेन्ट या रिअ‍ॅलिटी शोच्या दुसर्‍या सीझनचा किताब पटकावला. त्यांचे डान्स व्हिडिओ आणि ट्रॉफी जिंकल्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यांनी रजनीकांतच्या ‘माराना मास’ या गाण्यावर डान्स केला. त्यांचा जोश आणि थरारक डान्स पाहून अमेरिकेच्या जजेसनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिली. अमेरिका गॉट टॅलेन्टचे जज हॉवी मंडल यांनी परफॉर्मन्स पहिल्यानंतर ट्विट केलं, ‘इतर ग्रुपच्या तुलनेत तुमच्या ग्रुपमध्ये अधिक उत्साह आहे. तुमच्या परफॉर्मन्समुळे आता तुमच्यासाठी संपूर्ण जगाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि तुमच्यामुळे आमच्यासाठीही ते दरवाजे खुले झालेत.’

२९ डान्सरचा ‘वी अनबीटेबल’

या ग्रुपमध्ये १२ ते २७ वयोगटातील एकूण २९ डान्सर आहेत. हे २९ डान्सर आपल्या अॅक्रोबेटिक डान्सने सर्वांना थक्क करतात. अमेरिकाज गॉट टॅलेन्ट स्पर्धेत सहभागी होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. मागील वर्षी त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यावर्षी त्यांनी पुन्हा अमेरिकाज गॉट टॅलेन्टमध्ये सहभागी होत हा किताब आपल्या नावे केला. यापूर्वी त्यांनी इंडिया बनेगा मंच आणि डान्स प्लस सिजन ४ मध्येही सहभाग घेतला होता.

‘V’ फॉर विकास

वी अनबीटेबल ग्रुप मंचावर अॅक्रोबेटिक डान्स फॉर्म सादर करतो. यात अनेक असे स्टंट असतात, जे प्रेक्षकांचा श्वास रोखून धरतात. हे स्टंट रोमांचक आणि खतरनाक असतात. असेच स्टंट करताना या ग्रुपमधील विकास नावाच्या डान्सरचा मृत्यू झाला होता. त्याच्या नावावरून ग्रुपला ‘वी अनबीटेबल’ असे नाव देण्यात आले.

रणवीर सिंगचा मेसेज

ग्रुपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत रणवीर सिंगने एक व्हिडिओ मेसेज पाठवला. यात त्याने म्हटलं की, ‘मला या गोष्टीचा फार आनंद आहे की वी अनबीटेबल ग्रुप अमेरिकाज गॉट टॅलेन्ट शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की, तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही मिळवलं ते अविस्मरणीय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तुम्ही भारतीय नागरिकांची मनं जिंकली आहेत.’

‘या’ भागात अनेक डान्सर

नालासोपारा आणि भाईंदर भागात वर्षभरात अनेक डान्स स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातूनच जागतिक दर्जाचे डान्सर निर्माण होतात. या भागात अनेक डान्स क्लासेस तर आहेतच, मात्र शाळांमध्येही अभ्यासासह कलेला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे आज टीव्ही रियालिटी शो मध्येही या भागातील डान्सर्स पाहायला मिळतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More