भविष्यात आढळराव केंद्रात जाणार, मंत्री शिवतारेंना विश्‍वास – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

भविष्यात आढळराव केंद्रात जाणार, मंत्री शिवतारेंना विश्‍वास

पिंपरी – शिवाजीराव आढळराव हे ज्येष्ठ खासदार आहेत, त्यामुळे मी खात्रीने सांगतो की, भविष्यात केंद्रात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. मी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर उद्धवजींनी मला मंत्री केले. आज मी पुरंदर तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलून टाकतो आहे. गुंजवणी धरणाचे मोठे काम केले आहे. उद्या आढळराव पाटील यांना ही संधी मिळाल्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे चित्र पालटून जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग केंद्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आढळराव यांना निवडून द्यायचे की, डॉ. कोल्हेंच्या रुपाने साधा खासदार निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवा, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले.

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आंबेगाव तालुक्‍यातील शिनोली येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आढळराव म्हणाले की, 15 वर्षांत मी एक रूपयाचा भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर एकही डाग नाही. सतत लोकांच्या संपर्कात राहिलो. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गाव, वाडीवस्ती फिरलो. प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक तरी विकासकाम मी केले आहे. जनतेच्या सेवेत मी कुठेच कमी पडलो नाही, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More