नवी दिल्ली – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होची चर्चा जेवढी क्रिकेटच्या मैदानात असते तेवढीच मैदानाबाहेरही असते. ड्वॅन ब्राव्हो हा त्याच्या गाणी आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ब्राव्होचे चॅम्पियन हे गाणे आयसीसी वर्ल्ड कप-२०१६ दरम्यान चांगलेच हिट झाले होते. या गाण्यावर वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडूंनीही डान्स केला आहे. त्यानंतर आता ब्राव्हो पुन्हा एकदा नवीन गाणे घेऊन आला आहे. ब्राव्होचे ‘बोल देम आऊट’ हे गाणे सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. ब्राव्होने हे गाणे त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
Game day & @DJBravo47 feeling the vibes boiii #CPL2018 #Biggestpartyinsport pic.twitter.com/x63ZKJ4R3W
— CPL T20 (@CPL) August 8, 2018