#FifaWorldCup2018 ब्राझीलने मेक्सिकोला नमवले – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

#FifaWorldCup2018 ब्राझीलने मेक्सिकोला नमवले

सेंट पीटर्सबर्ग – विक्रमी पाचवेळा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकणार्‍या बलाढ्य ब्राझील संघाने आज झालेल्या बाद फेरीतील लढतीत मेक्सिकोचा 2-0 गोलांनी पराभव करून यंदाच्या या स्पर्धेतील आपला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला.

दोन विश्वातील बलाढ्य संघांतील हाय व्होलटेज असे वर्णन सामन्यापूर्वी या लढतीचे करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ही लढत शेवटपर्यंत रंगतदार ठरली. पण ब्राझीलने या लढतीत आपल्या आक्रमक खेळाचा छान ठसा उमटवून अखेर बाजी मारण्यात यश मिळविले. संपूर्ण सामन्यात हल्ले-प्रतीहल्ले पाहायला मिळाले. पण दोन्ही संघातील बचाव फळीने आणि गोलरक्षकांनी केलेल्या शानदार बचावामुळे सामन्यात दोनच गोलांची नोंद झाली. सामन्याच्या सुरुवातीला मेक्सिकोने आक्रमण करून ब्राझीलला चांगलेच अडचणीत आणले होते. त्यांच्या अचानक झालेल्या आक्रमणामुळे ब्राझील संघ काहीसा गडबडून गेला. मग मात्र त्यांनी स्वत:ला सावरले. विश्रांती अगोदर दोन्ही संघांना गोल करण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या. पण फिनिशिंग बरोबर नसल्यामुळे या संधीचे गोलात रूपांतर झाले नाही. विश्रांतीला गोलफलक कोराच राहिला. विश्रांतीनंतर ही बरोबरीची कोंडी ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमारने फोडली. त्याने विश्रांतीनंतर पाचव्याच मिनिटाला विल्यमसनच्या पासवर चेंडूला अचूक गोल क्षेत्रात दिशा दाखवून त्यांचे खाते उघडले. हा गोल झाल्यानंतर मेक्सिकोने आपले हल्ले तेज केले. तसेच गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. ब्राझीलच्या भक्कम बचावामुळे मेक्सिकोला गोल करता आला नाही. सामना संपायला अवघी तीन मिनिटे बाकी असताना त्यांच्या बदली आलेल्या रॉबर्टो फिरीमिनोने त्यांचा दुसरा गोल करून ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने आतापर्यंत मेक्सिकोविरुद्ध कधीच हार पत्करली नाही. तो विक्रम यंदादेखील अबाधित राखला. विश्वचषक स्पर्धेतील मेक्सिको विरुद्धच्या सर्वच्या सर्व पाचही लढती आता ब्राझीलनेच जिंकल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More