ब्रह्मोस एअरोस्पेसच्या इंजिनीअर निशांतचा नवा खुलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश

ब्रह्मोस एअरोस्पेसच्या इंजिनीअर निशांतचा नवा खुलासा

नागपूर – हेरगिरीच्या आरोपात अटकेत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेसचा सिस्टीम इंजिनीअर निशांत अगरवाल याने ए टी एस च्या चौकशी दरम्यान नवा खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. जी माहिती माझ्या लॅपटॉपमध्ये आहे तीच माहिती अन्य ब्रह्मोस एअरोस्पेसच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरसुद्धा उपलब्ध आहे. असा नवा खुलासा चौकशी दरम्यान समोर आलेला आहे.

नागपूर येथे वास्तवास असलेला आणि ब्रह्मोस एअरोस्पेसच्या सिस्टीम इंजिनीअर असलेल्या निशांतला पाकिस्तान देशाशी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. या चौकशी दरम्यान वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, त्यातीलच एक मोठा खुलासा म्हणजे ब्रह्मोस एअरोस्पेस बद्दलची जी माहिती निशांतच्या लॅपटॉपमध्ये उपलब्ध आहे, तीच माहिती ब्रह्मोस एअरोस्पेसच्या सिस्टीमध्ये काम करणाऱ्या इतर दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येसुद्धा उपलब्ध आहे. आणि अशा दहा अधिकाऱ्यांची नावे निशांतने एटीएसला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,

 ब्रह्मोस एअरोस्पेसमधील अशी काही गोपनीय माहिती आहे जी शेअर किंवा कोणत्याही पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करत येत नाही.
परंतु निशांतने  कुशाग्र बुद्धिचा वापर करून माहितीचे प्रिंट स्क्रीन घेतल्याची शक्यता आहे.  किंवा माहिती स्क्रीन असताना मोबाईल किंवा कॅमेऱ्याने त्या माहितीची चित्रफित बनवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More