इंदौर – बोहरा समुदायाकडून इंदौरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले असून त्यांनी धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची भेट घेतली. तसेच बोहरा समाजाला संबोधित केले. संबोधनातून मोदींनी बोहरा समाजाच्या देशभक्तीचे कौतुक करून माझं या समाजाशी अतूट नातं आहे असं म्हटलं.
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे दाऊदी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू आहेत. १२ सप्टेंबरपासून इंदौरमध्ये त्यांचे धार्मिक प्रवचन कार्यक्रम सुरू आहेत. सय्यदना प्रथमच इंदौरमध्ये आले आहेत.
Indore: Syedna Mufaddal Saifuddin, spiritual head of the Dawoodi Bohra community felicitates Prime Minister Narendra Modi, at Saifee Mosque pic.twitter.com/FdAUVXlnsC
— ANI (@ANI) September 14, 2018