बोरिवलीत टेम्पोच्या धडकेने तरुणाचा मृत्यू – eNavakal
अपघात मुंबई

बोरिवलीत टेम्पोच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

मुंबई – बोरिवली येथे भरवेगात जाणार्‍या टेम्पोच्या धडकेने एका 24 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. हर्षित हिंमत झांजरुलिया असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेल्याने त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. बोरिवली येथे हर्षित हा त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तो त्याच्या मोटारसायकलवरुन बोरिवलीतील न्यू लिंक रोडवरुन जात होता. गणपत पाटील नगर परिसरात येताच एका टेम्पोचालकाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात हर्षित हा गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हिंमत झांजुरुलिया यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याचा टेम्पो क्रमांक मिळाल्याने त्याला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बीडच्या 15 गावातील विदारक चित्र

बीड – जिल्ह्यातील वडवली तालुक्यात शेतकर्‍यांचे विदारक चित्र दिसत आहे. दोन महिन्यांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने पिके करपत चालली आहेत. त्यामुळे तालुक्यातील 15 गावातील...
Read More